काल शनिवार होता.
Yesterday was Saturday.
काल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते.
I was at the cinema yesterday.
चित्रपट मनोरंजक होता.
The film was interesting.
आज रविवार आहे.
Today is Sunday.
आज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही.
I’m not working today.
मी घरी राहणार.
I’m staying at home.
उद्या सोमवार आहे.
Tomorrow is Monday.
उद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.
Tomorrow I will work again.
मी एका कार्यालयात काम करतो. / करते.
I work at an office.
तो कोण आहे?
Who is that?
तो पीटर आहे.
That is Peter.
पीटर विद्यार्थी आहे.
Peter is a student.
ती कोण आहे?
Who is that?
ती मार्था आहे.
That is Martha.
मार्था सचिव आहे.
Martha is a secretary.
पीटर आणि मार्था मित्र आहेत.
Peter and Martha are friends.
पीटर मार्थाचा मित्र आहे.
Peter is Martha’s friend.
मार्था पीटरची मैत्रिण आहे.
Martha is Peter’s friend.